Breaking News

केळवणे येथे पोलीस आयुक्तांकडून सागरी सुरक्षा दल व मच्छिमारांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतीत आपटा फाटा ते केळवणे असा एकूण नऊ कि. मी.चा खाडी किनारा आहे. सदर खाडी किनारी डोलघर, कसारभाट, साई, दिघाटी, व केळवणे ही गावे आहेत. पोलीस ठाणे हद्दीत कासारभाट व केळवणे या दोन जेट्टी आहेत. या जेट्टीवरील सागरी सुरक्षा दल, ग्राम रक्षक दल व मच्छीमार बांधव यांची बैठक केळवणे गाव येथे नुकतीच झाली.

कोस्टल सिक्युरिटी मिटिंग दरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी उपस्थितांना सुचना दिल्या. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हद्दीतील खाडीकिनारी भागात पोलीस विभागाकडून नियमित दोन कर्मचारी यांची सशस्त्र पेट्रोलिंग असते आपल्या सागर रक्षक दल, ग्राम रक्षक दलाकडून तसेच मच्छिमार बांधवांकडून पोलीस विभागास योग्य ती मदत करावी. खाडीकिनारी असलेली गावे डोलघर, कासारभाट, साई, दिघाटी, केळवणे या सर्व गावांनी खाडीकिनारी संशयित बोटी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्या बाबतची माहिती तात्काळ पोलीस ठाणे, संबंधित बीट अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी. कासारभाट व केळवणे येथील मच्छीमार बोटींना एकसारखे पणा असावा. आपल्या भागातील बोटींना लाल रंगाचा कलर कोड देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त नव्याने बोटी तयार करण्यात आल्या असल्यास त्याबाबतची माहिती अद्यावत करून पोलीस ठाणेत कळवावे, असे सांगण्यात आले.

तसेच मच्छीमार बोटीच्या लाल कलर कोड व्यतिरिक्त इतर कलर कोड असलेल्या बोटी आपल्या हद्दीत आढळून आल्यास लक्ष ठेवावे व त्यांची संपूर्ण माहिती घ्यावी व त्याबाबत ची माहिती तात्काळ पोलीस ठाणेस, व संबंधित बीट अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी. मच्छीमार बांधवांनी मच्छीमारी करत असताना डिझेल चोरी व अवैद्य धंदे आढळून आल्यास याबाबतची माहिती पोलीस ठाणेस, संबंधित बीट अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी सदर वेळी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. कासारभाट व केळवणे जेट्टी येथे एमएमबी, पनवेल, यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता लेखी पत्रव्यवहार करणार असलेबाबत सांगण्यात आले आहे. मच्छिमार बांधवांनी मच्छीमारी करिता जात असताना बायोमेट्रिक कार्ड/आधारकार्डचा वापर करावा, असेही सांगण्यात आले.

या बैठकीस केळवणे गावचे सरपंच अश्विनी घरत, उपसरपंच राजेंद्र ठाकूर, विश्वनाथ म्हात्रे, मच्छिमार अध्यक्ष, व इतर 30 ते 35 नागरिक उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply