Breaking News

राज्यस्तरीय संमेलनात फणसाड अभयारण्याची चमकदार कामगिरी

वनमजूर प्रदीप बागवे यांचा विशेष सत्कार

मुरुड : प्रतिनिधी

वनविभागाच्या शहापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वन्यजीव संमेलनात येथील वनमजूर प्रदीप बागवे यांनी फणसाड अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव संपदा व पर्यटन विकासावर उत्कृष्ठ माहिती सादर केली. त्याची दखल घेवून या राज्यस्तरीय संमेलनात प्रदीप बागवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वनविभागाच्या शहापूर येथील वनप्रशिक्षण संस्थेत  नुकतेच क्षेत्रीय वनकर्मचार्‍यांचे राज्यस्तरीय वन्यजीव संमेलन घेण्यात आले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला मुंबईचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक  सुनील लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या संमेलनात विविध जिल्ह्यांतील वनविभागाच्या क्षेत्रीय वनकर्मचार्‍यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच त्यांना आलेले अनुभव यांचे सादरीकरण केले होते. रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यातील अधिसंख्य वनमजूर प्रदीप बागवे यांनी या राज्यस्तरीय संमेलनात फणसाड अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव संपदा व पर्यटन विकासावर उत्कृष्ठ माहिती सादर करून अभ्यारण्याद्वारे महसुली उत्पन्न कसे वाढवता येईल, याचे उत्तम मार्गदर्शन केले होते. त्याची दखल घेवून या प्रदीप बागवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, सहाय्य्क वन्यजीव संरक्षक एन. एन. कुप्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांचे मार्गदर्शन प्रदीप बागवे यांना लाभले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply