Breaking News

उरण जासई येथे 76 लाखांचे मद्य जप्त, तिघांना अटक

उरण : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उरण पथकाने दिव-दिमण येथून आलेले मद्याचे तीन ट्रेलर कंटनेर पकडले आहेत. यामध्ये 76 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स आढळले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करून वाहने जप्त करण्यात आली आहेत.
उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरात दिव-दिमण येथून परदेशी दारू येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी आपल्या पथकासह उरणमध्ये विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. रात्रीच्या सुमारास जासई उरण येथे तीन संशयित ट्रेलर आले असता त्यांची तपासणी करण्यात आली. त्या वेळी कंटेनरमध्ये सिग्नेचर व्हिस्कीचे दोन हजार 280 बॉक्स आणि मॅकेडॉल व्हिस्कीचे 375 आढळून आले. या दारूची किंमत 76 लाख रुपये आहे.
या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात हरिश्चंद्र गोरख गायकवाड (पाटोदा, बीड) मोहम्मद वसीर (मकदूमनगर, सुलतानपूर, (उत्तर प्रदेश) आणि देविदास तांदळे (आष्टी, बीड) यांचा समावेश आहे. हा दारूचा पुरवठा कुणाला केला जाणार होता याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे, अशी माहिती दुय्यम निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply