पनवेल : रामप्रहर वृत्त
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित ‘युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा विद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेतून तालुका स्तर वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय फेरी) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अकरावी विज्ञान शाखेतील श्रुती निवृत्ती घरत हिचा तृतीय क्रमांक आला. सदर विद्यार्थिनीने युवा जागर या स्पर्धेत जिल्हा स्तरावर सहभाग घेतला होता. तिला तृतीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. श्रुती घरत हिला इ. अकरावीत मार्च 2019 परीक्षेत विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात चषक देऊन गौरविण्यात आले. या यशबद्दल श्रुती घरतचे व विद्यालयाचे अभिनंदन ज.भ.शि.प्र. संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे सर यांनी केले.