Breaking News

पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा

उसर्ली सरपंचांसह सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसर्ली ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पक्षाचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. विचुंबे येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र देशासह संपूर्ण समाजाचा विकास करत आहे. त्यामुळे तुमच्या येण्याने उसर्ली ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळाली असल्याचे प्रतिपादन केले.
पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम होत आहे.
पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर तसेच विकास कामांवर प्रभावीत होऊन उसर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता भगत, नितीन भगत, ग्रामपंचायत सदस्य मुकेश भगत, अर्चना भगत, अरुण वाघमारे, माजी सरपंच मिनाक्षी वाघमारे, जितेंद्र भगत, माजी उपसरपंच जितेंद्र भगत, माजी सदस्य जयंत भगत, निलेश भगत, मुकेश भगत, हेमंत भगत, हरेश भगत, संतोष भोईर, वसंत भोईर, नितेश भगत, मयुरेश भगत, रमेश भगत, राजू रोडे, रमेश कोलाटकर, अर्जून बच्चे, सतीष खिलारी, निलेश ठाकूर, सुरेश रेवाळे, उमेश देवरे, सागर शास्त्री, दत्ता कांबळे, नागेश महामुनकर, संभाजी शिंदे, काका कदम, दिनेश रेडकर, कृष्णा शेवाळे, उत्तम मनगुटकर, वैभव जाधव, अनिल देवळेकर, संधेश कुबल, रामनारयण गुप्ता, सुरेश गुप्ता, जयेश चित्रे, परशुमराम पाटील, युसुफ लदाप, मधुकर भगत, राजू रोडे, रमेश भगत, अरुण भोईर, सचीन काळे, गजेंद्र चिमणे, चांगदेव मराठे, गणेश गावडे, सुख शांती सोसायटीचे अध्यक्ष विनोद कोडावळे, उपाध्यक्ष निलेश ठाकूर, सुरेश वाघ, बबन पराडे, लक्ष्मण कांबळे, देविदास कांबळे, सुभाष जाधव, दिनेश देवरुखकर, हर्षल कांबळे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
विचुंब्यातील दिपसीटी इमारतीमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषदेेचे माजी सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, राजेश पाटील, जयंत भगत, मच्छींद्र पाटील, विजय भगत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply