मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) करण्यात आले.
आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 8, 9, 10 डिसेंबर रोजी मोहोपाडा येथील एनआयएसएम मैदानात खेळली जात आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास पनवेल सेंट्रल रोटरी क्लबचे अध्यक्ष रतन खरोल, पनवेल सिटी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमांडर जांबेकर, डॉ. संतोष जाधव, सिकंदर पाटील, गणेश कडू, पंकज पाटील, प्रदीप खलाटे आदी उपस्थित होते. या वेळी माजी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मैदानात उतरून फलंदाजी करीत फटकेबाजी केली.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper