Breaking News

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह 11 जणांची हत्या

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

अरुणाचल प्रदेशमध्ये एनएनपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. संशयित छडउछ (नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हात असण्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी

गावात घडली. अबो अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम जागेवरून आमदार आहेत. दहशतवाद्यांनी तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला करून पहिल्यांदा अबो यांची हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील 10 सदस्यांचा खून केला. हा हल्ला नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडच्या दहशतवाद्यांद्वारे करण्यात आला. मेघालयचे मुख्यमंत्री संगमा यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply