Breaking News

‘एकनाथ पांडुरंग हनुमंते’ एक धगधगते वादळ

निरपेक्ष कामाचा एक तारा अखेर निखळला

नाथ पंढरी राहतो त्याप्रमाणे बुधवार 4 डिसेंबरला आपणा सर्वांमधला ’एक ऩाथ’ सर्वांना सोडून पंढरीला निघून गेला़ आणि सर्व हनुमंते परिवारासह अख्खा समाजच हळहळून गेला. नावाप्रमाणेच एक व्यक्तिमत्व. त्यांच्या नावातच सर्वकाही आहे. ’पांडुरंगाचा हा नाथ हनुमानाच्या ताकदीसारखा ़सर्वशक्तीनिशी करील सर्वांवर मात.’ त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने सर्वांना फार मोठा धक्का बसला. त्यातून त्यांच्या कुटुंबीयांना सावरणे म्हणजे फार मुश्कील झाले. वयाच्या 81व्या वर्षीही तीच उमेद, ़तीच जिद्द, ़तीच जगण्याची धडपडण्याची ताकद, क़धी हार नाही,  क़ाम करण्याची पद्धत, ़एक उत्तम प्रशासक ़अशी त्यांची ओळख आजही होती. कर्जतमध्ये राहत असताना पंजाब नॅशनल बँकेत क्लार्क म्हणून कामाला लागल्यापासून ते वरिष्ठ प्रबंधक (सीनिअर मॅनेजर) होऊन नंतर निवृत्त झाल्यावरही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली, नव्हे तर आजतागायत ती पार पाडली. ते धरून चार भाऊ आणि तीन बहिणी (शंकर, ज़गन्नाथ, ़एकनाथ, ़भानुदास, ़विमल (शैला), ़सुरेश ़शालन आणि सविता) असे मोठे कुटुंब. त्यांचे सर्वांत मोठे बंधू कै.शंकर हनुमंते हे सरकारी कर्मचारी. फ़ार पे्रमळ स्वभावाचे. त्यांच्यावर अकाली काळाने घाला घातला. छत्र हरपले होते. असे अनेक बिकट प्रसंग ओढावले. बरीच धडपड करावी लागली, पण डगमगून न जाता संपूर्ण कुटुंबाच्या मागे एका वटवृक्षासारखे उभे राहिले. त्यातही कधी कसली कसूर ठेवली नाही. हे सर्व करत असताना कुटुंबातील बहिणींची लग्न, भावांच्या जबाबदार्‍या कसोशीने पूर्ण करत आले. कुटुंबवत्सल अशी ओळख असलेल्या त्यांनी संपुर्ण कुटुंब एकत्रित ठेवले.

कर्जत, ठाणे, मुंबई ़सर्वत्र कामानिमित्त फिरत असताना (बदली होईल तशी त्यावेळी त्यांनी ठाणे, क़ोपरी, ़मुलुंड, भांडूप, उल्हासनगर अशा अनेक ठिकाणी पीएनबीच्या शाखा नव्याने सुरू केल्या. ़त्या अद्याप सुरळीत चालू आहेत.) निवृत्तीनंतर पुन्हा त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून मूळ गावी पनवेल निवडून कायम स्थित झाले.

आजमितीस कुटुंब परिवारासह त्यांनी आपली सामाजिक आपुलकीही जपली. अगदी पूर्वीपासूनच कुटुंबात आणि समाजात त्यांची एक वेगळी छाप होती. सर्व जण त्यांना ’नाथाभाई’ किंवा ’भाई’ म्हणूनच आदराने हाक मारायचे. कदाचित कामातील कठोरता, कसलीही हयगय नाही. यामुळेही बोलत असतील, पण ते जगलेही तसेच आणि जातानाही ’भाई’सारखेच गेले. कोणालाही कुठलाही त्रास न देता.

कर्जतचे थोर क्रांतिकारक भाई कोतवाल यांची स्मारक समिती असो, व्यायामशाळा आणि त्यासाठी केलेल्या आंदोलनापासून (त्यावेळचे त्यांचे सहकारी श्री. सुधाकर बुधकर, ़श्री. लक्ष्मण कोगजे, ़श्री. दत्तात्रय निकाम असे बरेच होते.) त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसचे थांबा आंदोलन असो, ते पनवेलमधील काळण समाज मंदिराची (हॉल)उभारणी, जडणघडणीच्या कामी अगदी हिरिरीने पुढाकार घेऊन केलेले काम ़हे एखाद्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही लाजवेल असे आहे. पुढे ते काळण समाजाचे अखिलचे उपाध्यक्षही झाले. सामाजिक बांधिलकीबरोबर एक कलाकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता, पण काही जबाबदार्‍या पार पाडता पाडता त्यांना जास्त योगदान देता आले नाही, परंतु भूमिका वठवण्याचे काम मात्र प्रत्येक क्षेत्रात अद्याप करत आले. खूप अशी उदाहरणे आहेत. त्यासाठी कलमाची शाईदेखील कमी पडेल, पण त्यांचे कार्य काही सांगायचे संपणार नाही.

’एकनाथ हनुमंते’ अगदी नावाप्रमाणे सर्वांचा एकच नाथ. ़अगदी हनुमानाच्या सर्व शक्तीनिशी सर्व प्रसंगांना सामोरे जात अख्खा डोलारा उभा केला. ह्दयविकाराच्या आजारालाही म्यान व्हावे लागले. खरंच म्हणतात ना ईश्वरी शक्ती आहे. ़ती भाईंच्या रूपाने आम्हा सर्वांना अनुभवास मिळाली. 1993 साली त्यांना पहिल्यांदा अ‍ॅटॅक आला. त्यानंतर त्यांची बायपास हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कै. डॉ. नितू मांडके यांनी केली.आज 26 वर्षे लोटली, पण कधी शिकस्त खाल्ली नाही. हदय फक्त 13 ते 15 टक्के चालू असताना आजवर एवढी मजल मारली.

आज खर्‍या अर्थाने हनुमंते कुटुंबीयांच्या परिवाराचा श्वास हरपला. एक वादळ शमले. नव्हे असे बोलणे चुकीचे ठरेल. कारण भाईंनी सर्वांना लढायला शिकवले. नव्या उमेदीने,  नव्या ताकदीने उभे राहायला शिकवले. त्यामुळे वादळ शमले नाही. ते जरी गेले तरी त्यांच्या खुणा मात्र आजही प्रत्येकाच्या मनावर कोरल्या आहेत. त्या वेळोवेळी प्रोत्साहन देत आहेत. नियतीपुढे कुणाचेही चालत नाही म्हणतात, पण त्याच नियतीपुढे शड्डू ठोकून संपूर्ण परिवार उभा करून दाखवणारा नाथांचाही नाथ

हाच ’एक नाथ’ होता हाच ’एक नाथ’ होता.

-प्रसाद हनुमंते

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply