Breaking News

पनवेलमध्ये रविवारी निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा होणार आहे.
भाजप हा सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, मात्र महाविकास आघाडीचे स्वार्थी आणि निष्क्रिय नेते, पदाधिकारी हेतुपुरस्पर नैना प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेत शासनातर्फे त्यावर तोडगा काढण्याकरिता भाजप, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी कटिबद्ध आहेत. त्या अनुषंगाने हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply