Breaking News

कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था

उरण ः प्रतिनिधी, बातमीदार
होळी सणानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सालाबाद प्रमाणे कोकणवासी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यासंदर्भात निवेदन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी आणि कार्यकारिणी सदस्य संतोष पवार यांनी आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांना दिले. आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांनी तातडीने दखल घेत रामनाथ म्हात्रे यांना अ‍ॅडव्हान्स बूकींग करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सालाबादप्रमाणे होळी सणा निमित्त कोकणात जाण्यासाठी जसे रत्नागिरी (रातराणी), माणगाव-महाड-पोलादपूर-खेड, दाभोळ-दापोली, देवरुख, कणकवली या ठिकाणी राहणार्‍या कोकणवासीयांनी या संधीचा लाभ घ्यावा, रामनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून घ्यावे, असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply