Breaking News

मिशन लोकसभा : पिंपरी, चिंचवडच्या वॉरियर्सशी संवाद

पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मावळ लोकसभा प्रवास बैठकीच्या निमित्ताने पिंपरी आणि चिंचवड विधानसभा वॉरियर्स बैठकीचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये शनिवारी (दि.23) करण्यात आले होते. या वेळी वॉरियर्सशी संवाद साधण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेसह सोशल मीडिया, नमो चषक, बूथ रचना, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, सुपर वॉरियर्सची निर्मिती आदी विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्यांनी तसेच नेत्यांनीही उपस्थित वॉरियर्सला मार्गदर्शन केले.
या बैठकीस प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अमर साबळे, बाळाभाऊ भेगडे, सचिव वर्षा डहाळे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, राजेश पिल्ले, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस विलास मडीगेरी, नामदेव ढाके, शैलाताई मोळक, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शितल शिंदे, युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुजाता पालांडे, भाजप कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे, किरण ठाकरे, चंद्रकांत नखाते यांच्यासह वॉरियर्स आणि सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच विजयी होणार आहे, पण तो विजय आणखी दिमाखदार व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply