Breaking News

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच!

वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांचा प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठोबा लक्ष्मण मालुसरे आणि प्रवीण मालुसरे यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 2) जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून होणार्‍या विकासकामांवर प्रभावीत होऊन तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत आहेत. त्यानुसार होत असणार्‍या विकासकामांवर प्रभावीत होऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठोबा लक्ष्मण मालुसरे आणि प्रवीण मालुसरे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच अशोक पवार, उपसरपंच प्रवीण पालव, गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच प्रविण म्हात्रे, अत्माराम मालुसरे, नथुराम मालुसरे, बळीराम मालुसरे, हरिचंद्र भालेकर, वामन मालुसरे, बबन मालुसरे, अतिष मालुसरे, संतोष पाटील, हरिषंद्र मालुसरे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply