Breaking News

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24चा परितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि. 2) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य अमोघ प्रशांत ठाकूर, सरला चौधरी (उपाध्यक्ष,पालक शिक्षक समिती), स्मिता भालेकर (जाँईट सेक्रेटरी, पालकशिक्षक समिती) तसेच सीकेटी विद्यालयातील विविध शाखाप्रमुख उपस्थित होते. विद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेत मुख्याध्यापक संतोष चव्हाण प्रास्ताविक केले व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यालयात संपूर्ण वर्षभरात यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा परितोषिक वितरण समारंभप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला.

प्रमुख पाहुणे अमोघ प्रशांत ठाकूर यांनी विद्यालयाने उत्कृष्टपणे कामकाज केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुपरवायजर नीरजा मॅडम आणि सर्व शिक्षक यांची प्रशंसा करून अभिनंदन केले. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना अमोघ प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी निश्चीत यश मिळविण्यासाठी जीवनात अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला. तसेच मिळालेल्या यशाने भारावून न जाता आणखी अधिक चांगल्याप्रकारे यश कसे मिळविता येईल व विद्यालयाचे नाव जागतिक स्तरावर कसे नेता येईल यासाठी परिश्रम करावे, असे सांगितले. सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका प्राचीइसे व वैशाली रंगारी यांनी तर स्वाती काळे यांनी आभार मानले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख सचिव मा. डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply