Breaking News

चिपळे गावात शेकापला धक्का

उपसरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
चिपळे ग्रामपंचायतीमधील शेकापचे विद्यमान उपसरपंच मुकेश मुकेश फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, बळीराम बारकू फडके, दिनेश बळीराम फडके, सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये सहभागी होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
मार्कट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिपळेचे माजी सरपंच रमेश पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, कोप्रोली ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश म्हस्कर, सुनिल धर्मा फडके, माजी सदस्य दिपक वालकु फडके, माजी सदस्य भरत पाटील, समाधान किसन फडके, महेंद्र रामा फडके संदेश पाटील सागर पाटील, समीर दिनकर पाटील, समीर पद्माकर पाटील, स्वप्निल पाटील, किशोर फुलोरे, गणेश म्हास्कर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply