Breaking News

धामोळे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी धामोळे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटनावेळी केले. तसेच पापडीचा पाडा येथील शाळेला दोन लाख रुपयांची मदत आणि फरशीचापाडा येतील शाळेचे भाडे देणार असल्याचेही जाहीर केले.
पनवेल तालुक्यातील धामोळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या नुतन इमारतीसाठी आरंभ संस्था, क्रोडा केमीकल कंपनी आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने सुमारे 40 लाख रुपयांमधूून हे काम मार्गी लागले आहे.
या कार्यक्रमावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, गटशिक्षण अधिकारी सिताराम मोहिते, पोषण आहार अधिक्षक नवनाथ साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे, आरंभ संस्थेच्या ट्रस्टी शोभा मुर्ती, क्रोडाकंपनीच्या सिनीयम मॅनेजर आरती साळवे, रोटरी क्लब ऑप नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप मराठे, केंद्र प्रमुख हिराचंद पाटील, पंचायत समितीचे बांधकाम अभियंता अभिजित मटकर, मुख्याध्यापक भालचंद्र पाटील, सुशिल वाघमारे, कविता गव्हाणे, सीमा सिरसट, अभिजित मटकर यांच्यासह मान्यवर
उपस्थित होते.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply