Breaking News

रायगडात 89.02 टक्के पाऊस

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. 21) दोन हजार 863  मिलीमीटर पाऊस पडला आहे. वार्षिक पर्जन्यमान सरासरीच्या 89.02 टक्के पाऊस पडला आहे.
रायगड जिल्ह्याचे व वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. यंदा अडीच महिन्यांत 2863.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या वर्षीदेखील वार्षिक पर्जन्यमानापेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
यंदा जून महिन्यात सरासरी 982.21 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात सरासरीच्या 149 टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरी 1561.37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात सरासरीच्या 129.45  टक्के पाऊस पडला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता, पण गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी 874 मिलीमीटर पाऊस पडतो.  यंदा मात्र 21 ऑगस्टपर्यंत सरासरी 319.60 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. हे प्रमाण महिन्याच्या सरीसरीच्या तुलनेत केवळ 36.55 टक्के आहे. आता पावासाने पुन्हा जोर धरल्याने हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.    
पनवेल आणि श्रीवर्धन तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे, तर खालापूर आणि माथेरान येथे तुलनेत कमी पाऊस पडला आहे. उर्वरित तालुक्यांत पावसांचे प्रमाण चांगले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply