Breaking News

अधिवक्ता परिषदेतर्फे आदिवासी वाड्यांमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

रामप्रहर वृत्त:

अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका  तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  शुक्रवारी (दि. १५) पनवेल तालुक्यातील दुर्गम अशा तामसई (वाडी) व  मौजे बोंडरपाडा या गावांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम अधिवक्ता परिषद, पनवेलचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
            सदरच्या कार्यक्रमास अधिवक्ता मनोज कृष्णाजी भुजबळ उपाध्यक्ष (संघटन), अधिवक्ता परिषद, रायगड जिल्हा तथा अध्यक्ष, पनवेल बार असोसिएशन, अधिवक्ता सुनील नारायण तेलगे, सचिव/मंत्री (संघटन), अधिवक्ता परिषद, रायगड जिल्हा, अधिवक्ता मनोज म्हात्रे, कार्यालयीन सचिव, रायगड जिल्हा,  प्रल्हाद खोपकर, कार्याध्यक्ष, अधिवक्ता परिषद,  पनवेल तालुका, अस्मिता भुवड, सचिव (संघटन), अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका, अधिवक्ता आशा भगत, उपाध्यक्ष (लिटिगेशन), अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका, अधिवक्ता पोर्णिमा सुतार, अधिवक्ता नूतन केणी, अधिवक्ता सुवर्णा तांडेल, अधिवक्ता छाया म्हात्रे, अधिवक्ता सुनीता प्रभू, अधिवक्ता दर्पण पाटील, अधिवक्ता अंजली जाधव, अधिवक्ता मनीषा गावंडे, अधिवक्ता मनीषा गायकर, अधिवक्ता सुजाता शेलार, अधिवक्ता सारिका लबडे, आधिवक्ता ज्योती उरणकर, अधिवक्ता शशिकांत कालू म्हात्रे, अधिवक्ता धनराज तोकडे, अधिवक्ता शशिकांत आलू म्हात्रे, अधिवक्ता भूषण म्हात्रे तसेच अधिवक्ता परिषदेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सामजिक कार्यकर्ते  चेतन वाघ उपस्थित होते. त्यांनी आदिवासींकरीता असलेल्या विविध कल्याणकारी सरकारी योजनांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात अधिवक्ता अमिता वीरकर, अधिवक्ता ज्योती उरणकर, अधिवक्ता मनोज भुजबळ, अधिवक्ता सुनील तेलगे, अधिवक्ता आशा भगत यांनी देखील उपस्थित महिला वर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच त्यानंतर मौजे तामसई वाडी तसेच मौजे बोंडरपाडा येथील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाउपरांत सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद, पनवेल यांनी अभिनव उपक्रम घेऊन आयोजित केलेल्या सदरच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे समाजातील विविध वर्गाकडून स्वागत व कौतुक करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply