खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्या मार्गाचे काम सुरू असताना ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड कर्जत-चौक या मुख्य रस्त्यावर येऊन आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी 5.30च्या सुमारास घडली.
देवकाबाई महादू बडेकर (वय 60) आणि त्यांचा मुलगा सचिव महादू बडेकर (वय 45, दोघेही रा. किरवली, ता. कर्जत) अशी मृतांची नावे आहेत. ते दुचाकीवरून घरी येत असताना वडविहीर त्यांच्या अंगावर ब्लास्टिंगचे दगड पडले. याशिवाय चंद्रकांत मर्या मोकल (वय 65), वंदना चंद्रकांत मोकल (वय 60, रा. बेणवले, पेण), विकास भारत भोसले (रा. इंदापूर) यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …