Breaking News

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्व. संजय दिनकर भोपी यांच्या स्मरणार्थ आनंदी ग्रुप अंतर्गत संजय भोपी स्पेशल क्लब, मॉर्निंग योग ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक धाव आरोग्यासाठी ही महिला मॅरेथॉन रविवारी (दि.17) आयोजित करण्यात आली होती. खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल ग्राउंड येथे झालेल्या या स्पर्धेला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध उपक्रमांद्वारे महिलांचा सन्मान करून त्यांच्या सशक्तीकरणाचा प्रयत्न केला जातो. यालाच अनुसरून खांदा कॉलनीत महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपक्रमास शुभेच्छा आणि महिलांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेवेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजप खांदा कॉलनी सरचिटणीस भीमराव पोवार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, अर्चना ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या वंदना बावसर, डॉ. शीतल कांडपिळे, संजय पाटील, प्रसन्न, डॉ. मोतिलिंग, प्रेमा भोपी, जयंती प्रसन्न, मिता कपाडिया यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply