Breaking News

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि.16) प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा झाला. या वेळी शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांनी केले. ज्युनिअर केजीतील सान्वी डोलकर हिने स्वागताचे छान भाषण सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य पेश केले. यामध्ये त्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे हे वेगवेगळ्या वेशभूषा व भूमिकांद्वारे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तसेच मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply