Breaking News

रायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 90 पैकी 9 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 2 ग्रामपंचायतींमध्ये एकूण जागांपैकी काही जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही.  79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत; तर 689 सदस्य पदासाठी एक हजार 631 उमेदवार राजकीय नशीब आजमाविणार आहेत. महाड तालुक्यात 3; तर माणगाव, रोहा व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यात 5, माणगावमध्ये 2; तर अलिबाग व रोहा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा एकूण 9 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तेथे सदस्य निवडून देण्यासाठी मतदान होणार आहे. 90 सरपंच पदांसाठी 375 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 1 अर्ज छाननीत अवैध ठरला. त्यानंतर 374 पैकी 148 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. 9 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 79 सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत. 90 ग्रामपंचायतींचे 845 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी दोन हजार 358 जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. 61 अर्ज छाननीत अवैध ठरले. आता 1 हजार 631 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढविणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply