पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या 75 झोपड्यांवर कारवाई करून त्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेने ही कारवाई करीत नागरिकांना मोठा दिलासा आहे.
बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण पाटील, अॅड. अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. बेलपाडा गावाच्या मागे आणि डोंगराळ भागात उभ्या राहिलेल्या या झोपड्या सहजा नजरेत येत नाहीत, मात्र या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या झोपड्यांना आंदण मिळू नये आणि अशा प्रकारामुळे झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घेता माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.
या मागणीनुसार सोमवारी (दि.15) सकाळी प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अतिक्रमणविरोधी प्रमुख रत्नाकर जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, अतुल मोहोकर आणि 50 कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करीत ती जागा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
या कारवाईबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे अनधिकृतपणे झोपड्यांचा विळखा उभारणार्यांना जरब बसली आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …