महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे रामदास शेवाळे, परेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे पंचायत समिती, चिंध्रण पंचायत समितीनिहाय बैठका पार पडल्या.
या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, शिवसेनेचे रूपेश ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.