पनवेल ः प्रतिनिधी
बेलपाड्यातील मंदिरातील दानपेटी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या चोराचे नाव झाकीर हुशेन कुरेशी असून, तो तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. खारघर सेक्टर तीन बेलपाडा गावात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केले होते, मात्र चोरांचा सुगावा लागला नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिरासमोरच मंडप डेकोरेटरचा व्यवसाय करणार्या घरात सीसीटीव्ही नियंत्रण केले जात असताना एक चोरटा मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास येताच त्यास रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.