Breaking News

महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणार्या 13 जणांना मोक्का

बारामती ः प्रतिनिधी

राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

सचिन पडळकर (30), डॉ. इंद्रकुमार भिसे (42), दत्तात्रय करे (34), विकास अलदर (34), तात्यासाहेब कारंडे (26), बिरुदेव कारंडे (23), सुशांत करे (19), दीपक जाधव, नितीन पिसे (23) यांना पोलिसांनी अटक केली. या नऊ जणांसह जगन्नाथ जानकर, विनायक मासाळ, राजू अर्जुन व रमेश कातुरे यांचा आरोपींत समावेश आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यांचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपींवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अण्णासाहेब रुपनवर (54) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपींनी 4 मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये तर 6 मे रोजी स्वारगेट येथील नटराज हॉटेलात फिर्यादीला बोलावून ना. जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, तसेच दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू, असे सांगून फिर्यादी रुपनवर यांना या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवली होती.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply