Breaking News

अनाथ मुलांच्या मदतीसाठी गाण्यांचा कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील आपुलकी फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, बाल सुब्रहमण्यम यांच्या गाण्यावर आधारित ’ए म्युझिकल ट्रिब्यूट’ हा गायनाचा कार्यक्रम सादर झाला. अनाथ मुलांच्या मदतीसाठी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी आयोजनाबद्दल आणि अनाथ मुलांना करण्यात येणार्‍या मदतीबद्दल फाउंडेशनचे कौतुक केले.
या कार्यक्रमास आपुलकी फाउंडेशनचे सल्लागार नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, डॉ. सचिन जाधव, कामगार नेते अनिल जाधव, आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, प्रवीण मोहोकर, दिनेश भास्कर, मिलिंद उरणकर, रमेश गरुडे, जितेंद्र खैरे, संजय जगताप, सचिन दुंद्रेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक गोविंद मिश्री, जया पियुष, संदीप शहा, शाकंबरी बागडे, डी. महेश यांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास अरुण कारेकर यांचे संगीत संयोजन लाभले. या कार्यक्रमातून जमा झालेल्या रकमेतून बालग्राम अनाथ आश्रमाला मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंंडेशनचे प्रवीण मोहोकर यांनी दिली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply