लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 4) अभिनंदन केले. पूर्व उच्च प्राथमिक विभागात पाचवीच्या आरव पंढरीनाथ भिलारे, अंश संजय कडू, वेदक नरेंद्र ठाकूर या तीन विद्यार्थ्यांना, तर माध्यमिक विभागात आठवीच्या श्रीपाद लक्ष्मण भगत, अन्वी गगन कोळी, अंतरा किरण पाटील, वेदांश प्रवीण पाटील या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयात विशेष मार्गदर्शन करण्यात आले होते तसेच वेळोवळी सराव परीक्षा घेतल्या गेल्याचे या वेळी प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोळे यांनी सांगितले.