Breaking News

पनवेल तालुक्यात विजयाचा जल्लोष!

पनवेल ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सरशी करीत बहुमत मिळविले, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्याबद्दल पनवेल भाजपच्या वतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.

भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात, तर उरण मतदारसंघात जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाने विशेष मेहनत घेत मताधिक्य दिले. ’सब का साथ सब का विकास’ आणि ’श्रीरंग बारणे यांना मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत’ ही संकल्पना घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला.

श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी पनवेल-उरणमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी तसेच आरपीआयचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या विजयाबद्दल भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षाने पनवेल-उरणमध्ये जागोजागी जल्लोष केला.  या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply