पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ मंगळवारी (दि. 16) झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 46 भाविक जखमी झाले आहेत. जखमींना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या रुग्णालयाला भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चाललेल्या भाविकांच्या खासगी बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच डॉक्टरांसोबत चर्चा करून जखमींच्या औषधोपचाराबाबत माहिती घेतली.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …