पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा प्रभाग समिती ड च्या माजी सभापती सुशिला घरत यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 15) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
अस्मिता कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात सोमवारी करण्यात आले होते. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, के.डी.म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता घरत, मनीषा चिले, सल्लागार परशुराम ठकेकर, कार्याध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष नानचंद भोपी, सचिव शेखर करमकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, खजिनदार राहुल मलोतकर आदी उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper