Breaking News

…तर त्याला जशास तसे उत्तर द्या -आमदार नितेश राणे

उरण ः रामप्रहर वृत्त
आपल्या आया, बहिणींकडे कोणी वाकडी नजर करून बघत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर द्या आणि अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून जागृत रहा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी (दि.30) शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच यशश्रीला श्रद्धांजली वाहिली. उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. पोस्टमार्टममध्ये तिच्या शरीरावर वार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या निंदनीय कृत्याचे राज्यभरात उमटले आहे. आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिंदे कुटुंबियांची उरणमध्ये भेट घेतली, तसेच पोलिसांशीही संवाद साधला.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply