Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वावंजे आणि फणसवाडी शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील वावंजे आणि फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी  (दि. 30) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील वावंजे आणि फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवजी दुर्गे, प्रकाश खैरे, ज्येष्ठ नेते बंडूशेठ गोंधळी, जाकर शेख, सुनील साठे, ग्रामपंचायत सदस्य हरेश पाटील, बबनशेठ कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शिक्षक, पालकांनी आभार मानले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply