Breaking News

जेईई मेन परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी

अक्षत डागा 99.94 टक्के गुण प्राप्त करीत नवी मुंबईत टॉपर; सहा विद्यार्थी 99 टक्के पार, एकूण 30 विद्यार्थ्यांनी मिळविले 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशातील सर्वांत मोठी अभियांत्रिकी परीक्षा असलेल्या जेईई मेन 2024 परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत डागा या विद्यार्थ्याने तब्बल 99.94 टक्के गुण प्राप्त करीत नवी मुंबईत टॉपर होण्याचा सन्मान मिळविला आहे. 30 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत आणि त्यामधील सहा विद्यार्थ्यांनी 99 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. देशभरातील 11 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्या अनुषंगाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन 2024 या परीक्षेचा जानेवारी सत्राचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत डागा या विद्यार्थ्याने तब्बल 99.94 टक्के गुण मिळवून नवी मुंबईत टॉपर होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तसेच हर्षिता जारोंडे हिने 99.70 टक्के, अनय श्रीवास्तव 99.52 टक्के, पहिलप्रित कौर 99.22 टक्के, विनायक भद्र 99.21 टक्के, तर रूपेश महापत्रा याने 99.05 टक्के गुण अशा या सहा विद्यार्थ्यांनी 99 टक्केपेक्षा गुण मिळविले. हरित दोषी याने 98.94 टक्के, रिद्धिमान द्विवेदी 98.74 टक्के, हर्षित कांडपाल 98.24 टक्के, अनिश महापत्रा 97.13 टक्के, देवांश पाटील 96.69 टक्के, गौरंग सेलोकर 96.55 टक्के, दिव्यांनी गुल्हाने 96.24 टक्के, अथर्व कुलकर्णी 95.52 टक्के, प्रियांश गुप्ता 95.32 टक्के, इस्माईल नाईक 94.61 टक्के, प्रांशू भाले 94.35 टक्के, तेजस्व चौधरी 93.97 टक्के, देवांशू भट 93.66 टक्के, अद्रिता काकोटी 93.50 टक्के, तेजस श्रीवास्तव 93.29 टक्के, कुश विरदीया 93.20 टक्के, प्रिशा गुप्ता 93.13 टक्के, संबित सरकार 92.53 टक्के, हरी शंकर अय्यर 91.46 टक्के, आर्य गोसावी याने 91.44 टक्के गुण प्राप्त केले.
शिक्षणासोबतच सामाजिक, कला, क्रीडा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत उज्ज्वल यशाची परंपरा असलेल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी करीत याही परीक्षेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply