पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून एज्युकेशन वर्ल्डकडून ग्रँड ज्युरी इंडियन हायर एज्युकेशन रँकिगसाठी 2024-25 या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आलेे आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.
शैक्षणिक गुणवत्ता, विविधता, समावेश आणि समानता यासाठी खारघरचे रामशेठ ठाकूर कॉलेज प्रसिद्ध आहे. याचीच दखल घेत एज्युकेशन वर्ल्डने हा पुरस्कार दिलेला आहे. सहाव्या क्रमांकाचा हा पुरस्कार असून चषक आणि प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरूप आहे. हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करत असते. विविध उपक्रम, कार्यशाळा आणि परिषद यांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा वाढविण्यासाठी कॉलेजमध्ये प्रोत्साहित केले जाते.
या सर्वांचे फलित म्हणूनच कॉलेजला डायव्हर्सिटी, इन्क्लूजन आणि इक्वॅलिटी चॅम्पियनसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक मानांकन नसून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाची, समर्पणाची दखल आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे उपस्थित होते.
दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, स्कूल कमिटी सदस्य प्रभाकर जोशी यांनीही अभिनंदन केले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …