Breaking News

नवी मुंबईतही बोगस लसीकरण

नवी मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक बोगस लस प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. आता नवी मुंबईतही एप्रिलमध्ये झालेल्या एका लसीकरण शिबिरात बनावट लस दिली गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. मनीष त्रिपाठी व करीम अशी दोन आरोपींची नावे असून तिसर्‍या आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. आरोपींना मुंबई पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून नवी मुंबईतील शिरवणे भागात घेण्यात आलेल्या शिबिरात बनावट लस दिल्याचे निष्पन्न झाले आहे. शिरवणे एमआयडीसीमध्ये अ‍ॅटोबर्ग टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत हे लसीकरण शिबिर झाले होते. यामध्ये कंपनीतील कामगार व कर्मचार्‍यांपैकी 352 जणांना लस देण्यात आली. यासाठी प्रतिलस एक हजार 230 रुपये असा एकूण चार लाख 33 हजार (यात  येण्या-जाण्याचे आठ हजार 700) असा खर्च वसूल करण्यात आला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply