सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने भंगारपाडा गावातील सुमारे 100 कुटुंबांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, गजानन कटेकर, कृष्णा कटेकर, समीर कटेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल गव्हाणकर, चंद्रकांत गोसावी, भास्कर दमडे, गोपीनाथ कटेकर, बी. एन. पाटील, निखिल कटेकर, मयूर कटेकर, जयेश कटेकर आदी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …