Breaking News

विकासकामे भाजपच करू शकतो -अरुणशेठ भगत

केळवणे येथे विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेकापने विकासाच्या कामांना विरोध करण्याचे काम नेहमीच केले आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना विविध सुविधा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी सातत्याने पुढाकार घेत भरपूर निधी देत आहेत. त्यामुळे विकासाची कामे ही फक्त भाजपच करू शकतो, असे प्रतिपादन पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 25) केळवणे येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या 95 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून केळवणे येथे करण्यात येणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस व माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, उरण विधानसभा प्रचार प्रमुख प्रवीण काळबागे, भाजपचे केळवणे गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, केळवणे ग्रामपंचायत सदस्य ओमकार पाटील, दिघाटी ग्रामपंचायतीचे सदस्य अमित पाटील, युवा मोर्चा केळवणे पं.स. विभागीय अध्यक्ष सुशील ठाकूर, मोर्चा केळवणे पं.स. विभागीय उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, रमेश ठाकूर, महादेव म्हात्रे, रवींद्र माळी, नंदकुमार गावंड, नारायण म्हात्रे, विनायक कोळी, अरुण कोळी, सतीश घरत, दत्ता शिवकर, योगेश घरत, सत्त्यम ठाकूर, जयवंत गावंड, सचिन ठाकूर, कृष्णा म्हात्रे, राजन घरत, नितीन म्हात्रे, संतोष शिवकर, प्रितम कोळी, प्रितम शिवकर, भारत ठाकूर, राजेश घरत, जितू गावंड, राकेश कडू, तेजस पाटील, तेजस माळी, आकाश कोळी, ज्ञानेश म्हात्रे, कृष्णा पाटील, सुशांत ठाकूर, सुधाकर माळी, महेंद्र पाटील, सुरज घरत, विलास ठाकूर, ज्ञानेश्वर मंदिराचे सदस्य यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी केळवणे ग्रामपंचायत हद्दीतील वाघेश्वर रस्ता आणि गटार तयार करणे (50 लाख रुपये), केळवणेमध्ये सभागृह बांधणे (30 लाख रुपेय), तर केळवणे येथे स्मशानभूमी बांधणे (15 लाख रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या काळात या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत. याबद्दल आभार मानण्यात आले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply