Breaking News

आजपासून पनवेल बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय; अत्यावश्यक सेवांना वगळले

पनवेल ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने परसत आहे. त्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पनवेल महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी अधिक माहिती दिली.
पनवेल महापालिका आयुक्तांनी गर्दी टाळण्यासाठी पनवेलमधील नाट्यगृह, व्यायामशाळा, मॉल्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव आणि इतर व्यवसायही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या बंदमधून जीवनावश्यक वस्तू, बेकरी, दुग्धजन्य वस्तूंची दुकाने (डेअरी), किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालय आणि भाजीपाला दुकानांना वगळण्यात आले आहे. शहरातील आस्थापना, कारखानेही बंद राहणार असल्याने संपूर्ण परिवार घरीच असल्याने पाण्याचा वापर जास्त होऊ शकतो, पण पाणीपुरवठा जास्त होणार नसल्याने पाणी जपून वापरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
नागरिक मुलांना सुटी असल्याने मॉर्निंग वॉकला जातत. अनेक ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने बुधवारी सायंकाळी यापुढे कट्ट्यावर न जमण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल-ठाणे एसी लोकल बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एसटी बसेस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार लोकल ट्रेनची गर्दी 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. पनवेल-ठाणे एसी लोकल बंद करण्याचीही मागणी प्रवाशांनी केली होती. एसी लोकलमधील सेन्ट्र्लाइज एसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पनवेल-ठाणे एसी लोकल बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. परिणामी ट्रान्स हार्बरवरील एसी लोकलही शुक्रवारपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply