कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवारी (दि. 30) संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, माजी नगरसेवक विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, आशा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वडाचे झाड आहे हे लक्षात घेऊन त्याचे रोपटे लावून व त्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे संस्थेचे सेक्रेटरी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे यांनी आपले मौल्यवान विचार मांडले. मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्मवीरांचे विचार सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यालयाच्या इयत्ता दहावी, बारावी तसेच सीबीएसई स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी यांनी केले, तर लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास दोन्हीही विद्यालयांच्या पर्यवेक्षिका, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …