पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे. यानुसार सोमवारी (दि. 30) सुमारे 52 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून वांगणी येथे स्मशानभूमी, वांगणीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मोहो येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती आणि मोहोचा पाडा येथील अंगणवाडी ते गणपती घाटपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन आणि आठ लाख रुपयांच्या निधीमधून मोहोचा पाडामधील अंगणवाडी ते स्मशानभूमीपर्यंत झालेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा पवार, माजी उपसरपंच अरुण जळे, अनंता पाटील, प्रवीण म्हात्रे, सतिश मालुसरे, शैलजा भोईर, सदस्य अक्षता म्हात्रे तसेच अशोक पवार, माया कातकरी, गोविंद कातकरी, कमलाकर पुजारी, विष्णू कातकरी, संतोष कातकरी, बबन कातकरी, प्रवीण कातकरी, मोहन कातकरी, गोविंद घरत, बाळाराम पाटील, नामदेव दळवी, माजी सरपंच प्रमोद घरत, विठ्ठल पाटील, अप्पा पाटील, रवी घरत, गणेश पाटील, प्रसाद शिंदे, सुरेश कातकरी, मयुर घरत, विठ्ठल भोईर, अण्णा भोईर, अनंता पाटील, खंडू भोईर, गुरुनाथ भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …