कळंबोली येथे सेवाभावी उपक्रम
कळंबोली ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात येत आहे. कळंबोलीतील या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
नागरिकांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना बाजारभावापेक्षा कमी भावात फराळ बनवण्यासाठी साहित्य मिळावे या उद्देशाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ गेली अनेक वर्ष कळंबोलीत हा उपक्रम राबवत आहे. साखर, रवा, मैदा, गूळ, खोबरे, तेल, पोहे, शेंगदाणे, चणाडाळ, डालडा हे दिवाळी फराळाला लागणारे सामान या स्टॉलवर मिळणार आहे.
कळंबोली प्रभाग क्रमांक आठमध्ये माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या जनसंपर्क कार्यालयसमोर दिवाळी फराळ साहित्याचा स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांनी भेट दिली. या वेळी भाजप कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील आदी उपस्थित होते.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक