Breaking News

मोबाईल फोडल्याचा आळ घेतल्याने एकाची आत्महत्या

उरणमधील बेलपाडा गावातील घटना
उरण : प्रतिनिधी
मोबाईल जसा चांगला आहे तसे वाईट सुद्धा आहे. मोबाईल मुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत, मात्र उरण तालुक्यात मोबाईल मुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.मोबाईल मुळे झालेल्या भांडणातून बेलपाडा येथील सर्वेश कोळी याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.उरण तालुक्याला जोडलेल्या पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात राहणार्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्याने गावातील सर्वेश कोळी याच्यावर 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन फोडल्याचा आळ घेतल्याने सर्वेशने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे उरण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर न्हावा शेवा पोलिसांनी सर्वेशच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून योगेश कोळी याला अटक केली आहे, मात्र राजश्री कोळी यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. एकाच वेळी पती पत्नी असलेल्या योगेश कोळी व राजश्री कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतांना फक्त योगेश कोळी यांना अटक करण्यात आली आहे, मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे सर्वेश कोळी याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या राजश्री कोळी या महिलेलासुद्धा अटक व्हावी. या दोघांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वेशच्या कुटुंबीयांनी केली आहे

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply