पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी ज्या ज्या समस्या सुचवल्या त्या येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे तसेच प्रयत्नांमुळे अनेक विकासाची कामे मतदार संघात झाली आहेत. त्यांच्या या कार्यक्रणालीवर विश्वास ठेऊन गगणदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील संदीप कौर, नीता राजगे, विजया कुशवहा, शर्मिला दोंदे, शैला दोंदे, स्वाती बोडरे, जया नायर, मनजीत कौर, शितल खरजे, रीना सिंग, इंद्रजीत कौर, रेखा बिष्ट, वैशाली पवार, सरबजीत कौर, बेबी नायर, स्मीता नायर, गीता भाटला, योगीता पाटील, लालसा सिंग, पूनम सिंग, सुजाता शिवहरे, हरजीत कौर, शशिकला जंबूकर, शैलेंद्र बोडरे, प्रबज्योत सिंग, अनिल सुतार, सुखवींदर सिंग, किरण कदम, संदीप पाटील, मोहम्मद खुशनूरशेख, सइदाम शेख, विशाल राजगे, गुरविंदर सिंग, अशोक बोडरे, जगदीश बिष्ट, नरेंद्र सिंग, समाधान खरजे, अंशोक चंदणे, सतीत्र निवाळी मुकेश शिवमदार, विशाल सिंग, सतनारायण सिंग, राकेश कश्याप, मंथन मिश्रा, उत्तम पाटील, दत्तात्रय मोरे, यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले तसचे रहिवश्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची
ग्वाही दिली.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हा अध्यक्ष रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, माजी नगरसेविका मोनिक महानवर, रामा माहनवर, अमर ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …