पेण : प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. पेणचे कृषी व बियाणे विक्री केंद्रावर तालुक्यातील शेतकरी गर्दी करू लागले आहेत. पेणच्या बियाणे विक्री केंद्रावर यंदा दोन हजार क्विंटल संकरीत बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यात 43 प्रकारच्या संकरीत व सुधारीत बियाण्यांचे वाण शेतकर्यांसाठी
उपलब्ध आहेत.
पेण तालुक्यातील 13 हजार 100 हेक्टर लागवड क्षेत्रापैकी तब्बल पाच हजार हेक्टरावर खरीप हंगामात धूळ पेरणी केली जाते. धूळ पेरणी ही पावसाच्या आगमनापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर करण्यात येते. यंदा शेतकर्यांचा भरघोस उत्पन्न देणार्या संकरीत व सुधारित जातीचे बियाणे खरेदीकडे कल आहे. सध्या कोकण कृषी विकास केंद्रात सुपर फाईन तांदळाच्या अनेक जाती तसेच आंध्र महाबीज व इतर कृषी संशोधन केंद्रांनी तयार केलेल्या तांदळाच्या जातीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उच्च व चांगल्या प्रतिच्या भात बियाणाच्या 10 किलो पिशवीला 325 ते 750 रूपये असा भाव आहे.