Breaking News

महापालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे शुक्रवारी भूमिपूजन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी  
पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, विविध योजनांचे भूमिपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वाजता आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल राहणार असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आदिती तटकरे, ,खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, उपमहापौर सिताताई पाटील, विराधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर आदींची मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
यावेळी पुढीलप्रमाणे भूमीपूजन समारंभ होणार आहेत..
1) प्रभाग क्रमांक 14 मधील भूखंड क्र.04, से.16, नवीन पनवेल (प.) येथे पनवेल महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत- ’स्वराज्य’ बांधकाम करणे.
2) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाकाली नगर, वाल्मिकी नगर, टपाल नाका, लक्ष्मी वसाहत येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे.
3) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पटेल मोहल्ला व कच्छी मोहल्ला येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे.
4) प्रभाग क्र. 16 मधील भूखंड क्र. 28, से. 11, नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अ‍ॅकेडमी) विकसित करणे.
5) प्रभाग क्र. 4 मधील भूखंड क्र. 151, से. 21 खारघर येथे महापौर निवासस्थान – ’शिवनेरी’ बांधकाम करणे.
6) प्रभाग क्र. 7 मधील भूखंड क्र. 5, 6, 7 व 8, से. 8ई कळंबोली येथे प्रभाग कार्यालय –  ’विजयदुर्ग’ बांधकाम करणे.
7) भूखंड क्र. 13, काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे.
8) प्रभाग क्र. 13 मधील जुई गावामध्ये मल:निस्सारण वाहिन्या टाकणे, पंम्पिंग स्टेशन बांधणे व मल: प्रक्रिया केंद्र उभारणे.
लोकार्पण समारंभ
1) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. 125 मधील सुशोभिकरण केलेले वडाळे तलाव.
2) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. 127 अ मधील प्राथमिक मराठी कन्या शाळेची इमारत.
3)प्रभाग क्र. 13 मधील सुशोभिकरण केलेले जुई गावामधील तलाव.
4) अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतून पनवेल येथील मार्केट यार्ड, तक्का रोड, इच्छापूर्ती गणेश मंदिर, हरि ओम नगर, एच.ओ.सी. कॉलनी जवळील उभारलेले उंच जलकुंभ.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply