Breaking News

अंधत्वावर मात करून मिळविले 83 टक्के गुण

पनवेल : बातमीदार

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात दहावीत शिकणार्‍या एका अंध विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत 83. 40 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील अरिहंत सोसायटीत राहणारी कस्तुरी नेताजी भोसले ही जन्मताच अंध आहे. अंध असूनही दहावीच्या परिक्षेत 83 टक्के गुण मिळवल्याने कस्तुरी हिचे यश वाखाणण्याजोगे आहे. ती अंध असूनही रोज व्हॅनने शाळेत जायची. कस्तुरी नेताजी भोसले ही मूळची कोल्हापुर येथील आहे. ती 1 ली पासूनचे शिक्षण चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात घेत आहे. कस्तुरी अभ्यासात हुशार आहे. ती ब्रेल लिपित शिकायची. कस्तूरीला ब्रेल लिपि शिकविण्यासाठी एनएबी या संस्थेतुन कांचन कांबळे ह्या आठवड्यातुन दोनदा वरळीहुन यायच्या.

कस्तुरीला प्रवेश घेताना तीन शाळानी प्रवेश नाकारला होता. त्यामुळे तिचे 1 वर्ष वाया गेले. त्यानंतर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (एनएबी) या संस्थेची त्यांना माहिती मिळाली. ही संस्था अंध मुलांसाठी काम करते. त्यानंतर त्यांच्याद्वारेच कस्तुरीला नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात प्रवेश मिळाला. प्रज्ञा देवकर हिने कस्तुरीचे दहावीचे पेपर पेपर लिहिले. या वेळी शाळेने खूप सहकार्य केले असल्याचे मत तिच्या पालकांनी व्यक्त केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply