Breaking News

पोलादपूर तालुक्यात दोन कोरोना रुग्णांची भर

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना महाड व माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर शुक्रवारी (दि. 31) पोलादपूरच्या ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील चरई येथील एक गंगाराम जंगम हा हायपर डायबेटीस आजार असलेला 68 वर्षीय वृद्ध मयत झाल्यानंतर तालुक्यात थोडेसे भीतीचे वातावरण पसरले असताना शहरातील मठगल्ली भागात एका रुग्णाला उपचारासाठी माणगाव तालुक्यात पाठविण्यात आले. काही दिवस वातावरण चिंतेचे झाले असताना गुरुवारी चार रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. या बातमीने पोलादपूर तालुक्याला दिलासा मिळाला, मात्र गुरुवारी सायंकाळी शहरातील सैनिकनगर येथील एका व्यक्तीचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

शुक्रवारी दुपारी पितळवाडी आणि सडवली या दोन गावांतील प्रत्येकी एक व्यक्तीचा कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्याने आता ग्रामीण भागात पुन्हा सतर्कता वाढीस लागली आहे.

आतापर्यंत तालुक्यात एकूण 76 कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 53 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 17 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply