Breaking News

मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने अहमदाबादच्या जायडस कॅडिला या कंपनीच्या ‘जायकोव-डी’ या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या महिन्यात होणार्‍या राष्ट्रीय करोनाविरोधी लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी (दि. 7) ही माहिती दिली. जायकोव-डी ही 12 वर्षांची मुले किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेली पहिलीच लस आहे. केंद्र सरकारने या लसीच्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. एका डोसची किंमत कर वगळून सुमारे 358 रुपये आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply