Breaking News

शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून विवाहितेची बदनामी तसेच शारीरिक व मानसिक  छळ केल्याप्रकरणी सासरकडील सहा जणांवर रेवदंडा पोलीस ठाणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव येथील लॅब टेक्नीशियन असलेली 22 वषीय विवाहित महिला प्रणाली पाटील हिला 7 मे 2019पासून 14 एप्रिल 2020 दरम्यानच्या काळात  सासरकडील कुमार पाटील, रमेश पाटील, मंजुळा पाटील, शीतल सातमकर तसेच कोर्लई येथील अस्मिता महालकर, विनय महालकर यांनी वारंवार पैशाची मागणी करून व तिच्यावर घाणेरडा संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली तसेच बदनामही केले, अशी तक्रार प्रणाली पाटील हिने नोंदविली आहे. या तक्रारीनुसार सर्वांवर भा.दं.वि. कलम 498 अ, 323, 109, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार सरिता गोसावी करीत आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …

Leave a Reply