Breaking News

निळ्याशार जांभळाची बाजारपेठ

कर्जत तालुक्याच्या जंगल भागात मोठ्या प्रमाणात जंगलची मैना म्हणून ओळखली जाणारी जांभळं आणि त्या जांभळाच्या झाडापासून मिळणारे  उत्पन्न लक्षात घेता मोठ्या प्रमाणात या व्यवसायात आता फार्महाऊस पुढे येऊ लागले आहेत.त्यामुळे जंगलाची काळी मैना समजली जाणारी जांभळं यांची बाजारपेठ देखील कर्जतला फुलली आहे.मात्र या व्यवसायावर दलालांचा पडलेली नजर यामुळे स्थानिक आदिवासी यांच्या हातात जेमतेम मजुरी मिळताना दिसत आहे.

जांभळाची झाडे ही पूर्वी कोणी लावायला जात नव्हते,ती झाडे जंगलात आपोआप मोठी व्हायची आणि त्या झाडांवर आदिवासी लोक डोळा ठेवून मग उन्हाळा सुरू झाला की जांभळे काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक रसद गोळा करायचे.पण गिर्हाईक आपली आवड पाहून जांभळे विकत घेऊ लागल्याने आदिवासी लोकांच्या जांभळांना गिर्हाईक मिळेनासा झाला आणि आदिवासी लोक मगस्टेशन वर बाजारात बसून जांभळे विकू लागले आणि आपली गुजराण करू लागले.खववय्ये यांची आवड लक्षात घेऊन टपोरी,निळ्या रंगाची आणि जास्त गर असलेली जांभळे कुठे मिळतात यांचा शोध घेऊन शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मधल्या काळात जांभळाच्या झाडांची लागवड केली आणि त्यातील आरोग्यवर्धक असलेले जांभूळ या फळाचे पीक कर्जत तालुक्यात अमाप येऊ लागले.मग त्या जांभळाची विक्री रस्त्यावर,रेल्वे स्टेशन वर बसून करणे म्हणजे आर्थीक नुकसान आहे हे लक्षात घेऊन कर्जत मध्ये हा व्यवसाय करणारे आदिवासी लोकांनी दोन जागा हेरल्या आणि तेथे बसून जांभळांची विक्री करण्याचा घाऊक व्यवसाय सुरू केला. कर्जत रेल्वे स्टेशन परिसरात दोन ठिकाणी घाऊक विक्रीसाठी जांभळे आणली जातात.

काळीभोर आणि निलेशार जांभले खरेदी करण्यासाठी पुणे आणि कल्याण येथून घाऊक विक्रेते येत असतात. दररोज किमान 500 किलो जाम्भले यांची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.प्रामुख्याने तालुक्यातील वासरे परिसर,जामरुख परिसर,तसेच राजनाला परिसरात मोठ्या प्रमाणात जांभळांच्या झाडांची लागवड काही वर्षापूर्वी प्रयत्नपूर्वक करण्यात आली होती.त्यात प्रामुख्याने वजनाला जास्त भरणारी आणि चवदार अशी गर्वी आणि अन्य प्रकारच्या झाडांची लागवड झाली होती.त्यातही भेंडी जांभूळ, गोलटा,खट्टामिट्ठा आणि कोयनी या जातीची आरोग्यास अनुकूल आणि आरोग्यवर्धक समजली जाणारी अशी जांभळे यांची झाडे लावली गेली होती.त्या झाडांवरील जांभळे काढून त्यांची कर्जतच्या स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री मे महिन्यात होत असते.अशा सर्व झाडांवरील जाम्भले काढ़ण्यासाठी फलांनी बहरलेले सम्पूर्ण झाड दोन हजार रूपयापासून सहा हजार रूपयापर्यन्त कर्जत तालुक्यातील आदिवासी लोक खरेदी करीत असतात. आदिवासी लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो, परन्तु आदिवासी कुटुंबातील महिलांना मात्र सकाळी झाडावरुन काढलेली जाम्भले यांची पाटी घेवुन कर्जतच्या बाजारात यावे लागते. बीडच्या भागात अशा प्रकारची चांगली जाम्भले यांचे  उत्पन्न मिळत असल्याने सम्पूर्ण कुटुम्बे या कामासाठी बाहेर असतात.

कर्जत स्टेशन परिसरातील  डेक्कन जिमखाना परिसरमध्ये महिनाभर म्हणजे पावसाला सुरु होईपर्यन्त हा बाजार सकाळी दहा वाजल्या पासून  दूपारपर्यन्त सुरु असतो.प्रामुख्याने आदिवासी महिला बाम्बूपासून बनविलेल्या टोपल्या मधून ही नीलेशार जाम्भ्सले येथे विक्रीसाठी घेवुन येतात.आमच्या आदिवासी भागातील किमान दोनशे महिला जाम्भलांच्या टोपल्या घेवुन घावूक विक्रीसाठी हजर असतात.या आदिवासी लोकांनी व्यवसाय करण्यासाठी जांभळांना भरलेले संपूर्ण झाड खरेदी केलेले  असते.त्यावेळी त्या झाडावरून दिवसाआड चांगली तयार झालेली जांभळे काढण्यात येतात,आणि दुसर्‍या दिवशी विक्रीसाठी बाजारात आणली जातात.या कालावधीत आपण विकत घेतलेल्या झाडावरील जांभळे अन्य कोणी काढून घेत नाही ना?यावर देखील आदिवासी लोकांना नजर ठेवावी लागते.तर दुसरीकडे ते सम्पूर्ण झाड फळ काढण्यासाठी विकत घेतलेले असल्याने चांगला भाव मिळावा म्हणून दलाल लोक आणि खरेदी साठी आलेल्या महिला यांच्याशी घासाघीस करीत अधिक भाव पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करीत असल्याचे इंजीवली येथील जनाबाई गणेश मुकणे यांनी सांगितले.तर कर्जतच्या जाम्भलान्ना बाजारात चांगला भाव किरकोळ विक्री करतांना मिळत असल्याने आम्ही दिवसाआड़  कर्जतला घावुकपणे जाम्भले खरेदी करण्यासाठी येत असल्याचे पिंपरी येथील घावुक व्यापारी बेबी गुलाम बेग यांना वाटते.कल्याणच्या मार्केट मध्ये देखिल कर्जत ची जाम्भले अधिक प्रमाणात मागणी असलेली जाम्भले असल्याने आम्ही जाम्भले  खरेदी करतांना प्रथम कर्जतला प्राधान्य देत असतो अशी माहिती लक्ष्मी गायकवाड यांनी दिली.

एका पाटीला जांभळाच्या पाटी ला  300-400 भाव मिळत असून दररोज 500 किलो जाम्भले यांची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.पावसाळा सुरू होईपर्यंत जांभळांना मागणी असते,पण पावसाचा पहिला थेंब पडला की मग जांभळाची फळे कोणी खात नाहीत हे लक्षात घेऊन अधिक नफा मिळविण्यासाठी दलाल मंडळी ही आदिवासींच्या हातात कमी पैसे देऊन फळ विकत घेताना दिसतात.पण पाऊस पडल्यानंतर येत असलेल्या वट पौर्णिमेसाठी महिलांना पूजेसाठी जांभळाचे फळ आवश्यक असल्याने त्यासाठी देखील काही आदिवासी लोक झाडे निश्चित करून ठेवत असतात.मात्र दमा आणि हृदयाचे त्रास असलेल्या व्यक्ती यांना जांभळाचे फळ गुणकारी असते हे विज्ञानाने सिद्ध केले असल्याने गेल्या काही वर्षात फार्म हाऊस मध्ये देखील जाणीवपूर्वक आणि व्यवसाय लक्षात घेऊन जांभळाची झाडे लावली गेली आहेत.त्यातही प्रामुख्याने डहाणू भागातील जांभळे या झाडांची लागवड कर्जतच्या फार्महाऊस वर केलेली दिसून येत आहे.मात्र हा सिझनेबल व्यवसाय अनेकांचा उदरनिर्वाह चालविणारा असल्याने आणि जांभळं ही आरोग्यास गुणकारी असल्याने ती खावी अशीच वाटत असतात,त्यामुळे या व्यवसायाला मरण नाही.

-संतोष पेरणे

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply